कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर कारचा अपघात, पाच जणांचा मृत्यू
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर तळवडे गाव इथे भीषण अपघात झालाय. वेगाने येणारी कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय. अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी हे पुण्यातले आहेत. गणपती पुळेला जाताना हा अपघात झालाय. जखमींना उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.