कोल्हापूर : ऊसाला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी, कोल्हापुरातील बैठकीत निर्णय
Continues below advertisement
ऊस दरासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत तोडगा काढण्यात सरकारला यश आलं आहे. आज रविवारी दुपारी ऊस दरासंदर्भात झालेल्या बैठकीत प्रतिटन उचलीला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या प्रश्नावरुन आक्रमक झाली होती.
आज ऊस दरासंबंधी कोल्हापूरमध्ये खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, चंद्रकांतदादा पाटील आणि साखर कारखानदारांमध्ये बैठक झाली. या बैठकीत प्रतिटन पहिल्या उचलीबरोबर 100 रुपये आणि दोन महिन्यांनतर 100 रुपये असे एकूण 200 रुपये वाढीव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या एफआरपी दराला कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही हिरवा कंदील दाखवला आहे.
Continues below advertisement