कोल्हापूर : शिरढोण ग्रामस्थांचं शुद्ध पाण्यासाठी अर्धनग्न आंदोलन
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या प्रदूषणानं गंभीर रुप धारण केलं आहे. त्यामुळे नदीकाठची गावं आता शुद्ध पाण्याच्या मागणीसाठी आक्रमक होताना दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरढोणच्या ग्रामस्थांकडून शुद्ध पाण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शुद्ध पाणी न मिळाल्यास कर्नाटकात जाण्य़ाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
Continues below advertisement