Sharad Pawar | नाराजी विसरुन प्रचाराच्या कामाला लागा : शरद पवार | ABP Majha
शरद पवारांनी कोल्हापूरातल्या महाआघाडीच्या नेत्यांची एक बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसचे नेते सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पी.एन. पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यासह महाआघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित होते. महाआघाडीच्या नेत्यांना एकदिलानं काम करण्याचा सल्ला शरद पवारांनी यावेळी दिला. एकेकाळी आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला मोठं खिंडार पडलंय.. त्यापार्श्वभूमीवर आगामी निवडणूकात नेते आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी शरद पवार या भागात विशेष लक्ष देतायेत