बंगळुरु : धर्म वाचवण्यासाठी गौरी लंकेश यांची हत्या, परशुराम वाघमारेची कबुली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jun 2018 06:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केवळ धर्म वाचवण्यासाठी आपण पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली परशुराम वाघमारे याने दिली, असा दावा कर्नाटक एसआयटीने केला आहे. विशेष म्हणजे, गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी आपण बेळगावात ट्रेनिंग घेतल्याची कबुलीही परशुरामने दिली. त्यासाठी एअरगनचा वापर करण्यात आला.
गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी परशुरामला नेमक्या कुठल्या संघटनेनं किंवा संस्थेनं ही कामगिरी सोपवली? त्यामागे कुणाचा हात आहे? याबाबत कुठलीही माहिती अद्याप एसआयटीने दिली नाही.
दुसरीकडे, बंगळुरुत 5 सप्टेंबरला 2017 ला गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी त्याला तीन जणांनी मदत केली. या तीन जणांचा एसआयटी शोध घेते आहे. मात्र त्यांची नावं अद्याप उघड केलेली नाहीत. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी परशुरामला महाराष्ट्रातून अटक कऱण्यात आली आहे.