कोल्हापूर : अश्लील भाषा वापरणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची बँकेकडून दखल, कारवाईचे संकेत
Continues below advertisement
कोल्हापूरातील कर्ज वसूलीसाठी आश्लील भाषेत बोलणाऱ्या महिला अधिकाऱ्याची आरबीएल बँकेने चांगलीच दखल घेतलीय. बँकेच्यावतीने याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आलीय. तशी माहिती आरबीएल बँकेचे तज्ञ सल्लागार सुभाष कुत्ते यांनी एबीपी माझाला दिली. तसेच चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.
Continues below advertisement