कोल्हापूर : कोल्हापुरात 24 तासात मुसळधार पाऊस, राजाराम बंधारा पाण्याखाली
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात गेली चोवीस तास मुसळधार पाऊस सुरू झाल्याने जिल्ह्यातील सर्वच नदी पात्रांमध्ये पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील राजाराम बंधारा आज पहाटे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. तर पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी दीड फुटांनी वाढलेली आहे.
Continues below advertisement