कोल्हापूर : कोल्हापुरात मुसळधार पाऊस, 60 बंधारे पाण्यासाठी
कोल्हापूर जिल्ह्यात सलग सातव्या दिवशी मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे पंचगंगेच्या पातळीची धोक्याकडे वाटचाल सुरु आहे. शहरातील गायकवाड वाड्याजवळ पाणी आलं आहे. पावसाचा जोर वाढल्यानं 62 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर तब्बल 63 गावांचा अंशता संपर्क तुटला आहे. पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 5 राज्य मार्ग आणि 13 जिल्हा मार्ग असे 18 मार्ग पुर्णतः बंद झाले आहेत. पावसामुळं जिल्ह्यातील 39 घरांची पडझड झालीय. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे. नदीकाठच्या गावांनाही यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.