कोल्हापूर : गोकूळ दूध संघाचा राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना लीटरमागे 3 रुपये दरवाढ देण्याची तयारी सहकारी आणि खासगी दूध संघांनी दाखवली आहे. ही दरवाढ 21 जुलैपासून लागू होणार आहे. मात्र ५ रुपये दरवाढ द्या, असा आग्रह धरत आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका खासदार राजू शेट्टींनी घेतली. गोवा, कर्नाटक सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारनंही तशी मदत करावी. अन्यथा 16 जुलैपासून आंदोलन व्यापक आणि तीव्र केलं जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.