VIDEO | सरकारकडून पुणतांब्यातल्या कृषीकन्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न : राजू शेट्टी | एबीपी माझा
उसाच्या थकीत असलेल्या एफआरपीच्या मागणीसाठी काढण्यात आलेलं स्वाभिमानीचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय. साखर आयुक्तांनी भेट घेत कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर राजू शेट्टी यांनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. साखर आयुक्तांनी आंदोलनस्थळी जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेत एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिलं. दरम्यान जर आश्वासनपूर्ती झाली नाही, तर आमरण उपोषण करू, असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला आहे.