कोल्हापूर : अश्विनी बिद्रे हत्याप्रकरण पोलिसांकडून दडपलं जात आहे : राजू गोरे
बेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची हत्या डोक्यात बॅट मारून करण्यात आल्याचं आता उघड झालं आहे. अभय कुरूंदकर याने अश्विनीच्या डोक्यात बॅट मारून हत्या केल्याची कबुली कुरुंदकरचा मित्र महेश पाळणीकर याने पोलिसांना दिली आहे. हे प्रकरण अजूनही पोलीस दलातील अधिकारी दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अश्विनीचे पती राजू गोरे यांनी केला आहे..