कोल्हापूर : मंत्रिपदाचा गैरवापर करत चंद्रकांत पाटलांनी संपत्ती कमावली - राजेश क्षीरसागर
Continues below advertisement
मंत्रिपदाचा गैरवापर करुन चंद्रकांतदादा पाटील यांनी अमाप संपत्ती जमवल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. आज एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. चंद्रकांतदादा पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनींची परस्पर विक्री केल्याचा आरोपही क्षीरसागर यांनी केला आहे. त्यामुळे या आरोपांची सक्तवसुली संचलनालयाकडून तातडीने चौकशी करण्याची मागणीही क्षीरसागर यांनी केली आहे..
Continues below advertisement