कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गदारोळ
Continues below advertisement
कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत चांगलाच राडा झाला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकून मारल्या.
कोल्हापुरातील राजराम साखर कारखान्याची वार्षिक सभा आज कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. या कारखान्यावर काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळं ही सभा एकतर्फी होऊ नये यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या समर्थक सभासदांनी सभेत विविध प्रश्नांवर संचालकांना जाब विचारायला सुरुवात केली.
Continues below advertisement