कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशीला पूर, गोव्याकडे जाणारा मार्ग बंद

Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात गेले आठ दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्यानं कोल्हापुराला सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर- रत्नागिरी आणि कोल्हापूर-गगनबावडा या मार्गावर पुराचे पाणी आल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी आणि अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत .
जिल्ह्याच्या दक्षिण भागात सुरू असलेल्या पावसानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय, कोल्हापूरहून गोव्याला जाणारा चंदगड मार्गही हिरण्यकेशीला आलेल्या पुरामुळे बंद झालाय. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणाच्या यादीत असलेल्या अंबोलीत या नदीचा उगम होतो... त्यामुळे आंबोलीत पडणाऱ्या मुसळधार पावसानं हिरण्यकेशी नदीवरचे सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram