Shardiya Navratri 2019 | तोफेची सलामी दिल्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात घटस्थापना | ABP Majha
Continues below advertisement
देशभर घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. नवरात्रोत्सवानिमित्त साडेतीन शक्तीपिठांसह राज्यभरातील देवीची मंदिरं सजलीत. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी दिल्यानंतर घटस्थापना करण्यात आली. साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केलीय. पुढील नऊ दिवस मंदिरात भक्तीचा हा सोहळा पाहायला मिळणार आहे.
Continues below advertisement