कोल्हापूर : गुरुपौर्णिमेनिमित्त नरसोबावाडीत भाविकांची दर्शनासाठी गर्दी
Continues below advertisement
आज गुरूपौर्णिमा.. आपल्या आयुष्यात गुरूचं स्थान अढळ असतं. गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं राज्यभरात विविध मंदिरं सजली आहेत.. शिर्डीच्या साईबाबा मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे... तर साईसंस्थान भाविकांचं मोठ्या उत्साहात स्वागत करतंय.. कोल्हापुरातल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीचं दत्त मंदिर गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांच्या मोठ्या गर्दीनं फुलून गेलंय... सोलापूरमधील अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय... मंदिरापासून दोन किलोमीटरपर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळताहेत... तिकडे बुलडाण्यातल्या शेगावात
श्री गजाननमहाराजांच्या नामगजरात भाविकांनी अगदी सकाळी 5 वाजल्यापासून गर्दी केलीय. आणि आजच्या गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव साजरा करतायत...
श्री गजाननमहाराजांच्या नामगजरात भाविकांनी अगदी सकाळी 5 वाजल्यापासून गर्दी केलीय. आणि आजच्या गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव साजरा करतायत...
Continues below advertisement