कोल्हापूर | शारदीय नवरात्रौत्सवास सुरुवात, अंबाबाई मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. या नवरात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आलेला आहे. तर या संपूर्ण उत्सवावर 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.