कोल्हापूर : दर्शन शहा हत्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
कोल्हापुरातल्या दर्शन शहा हत्येप्रकरणात सत्र न्यायालयानं आज निकाल सुनावला. हत्या प्रकऱणातील आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे याला जन्मठेपेसह 1 लाख 5 हजारांचा दंड सुनावण्यात आला. दर्शन शहा याचं 25 डिसेंबर 2012 साली आरोपी योगेश याने अपहरण करुन त्याची हत्या केली होती. याप्रकऱणी कोल्हापूर सत्र न्यायालयानं आरोपी योगेशला दोषी ठरवत आज
जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, सरकारी वकील उज्वल निकम यांनी फाशीची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती जी न्यायालयानं फेटाळली.
जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, सरकारी वकील उज्वल निकम यांनी फाशीची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती जी न्यायालयानं फेटाळली.