
कोल्हापूर : पावसामुळे गगनबावड्याजवळ रस्त्यावर पाणी, कोकणात जाणारा मार्ग ठप्प
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात तुफान पाऊस सुरु आहे. पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरु आहे. नदीवरील ७५ बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर शहरात पाणी घुसण्याचा धोका निर्माण झालाय. शहरातील सखल भागात पाणी तुंबलं आहे. तसंच कोकण-गगनबावडा रोडवर मांडकुलीनजिक रस्त्यावर तीन फूट पाणी आल्यानं कोकणात जाणारा एक मार्ग बंद झालाय. धरण परिसरात मुसळधार पाऊस बरसत असल्यानं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Continues below advertisement