कोल्हापूर : कंदलगाव तलावातील पाणी खराब होऊ नये म्हणून गावकऱ्यांचा जागता पहारा
तलावातलं पाणी रंगपंचमीत दुषित होऊ नये म्हणून गावातल्या नागरिकांना चक्क पहारा द्यावा लागतोय. करवीर तालुक्यातील अनेक तलाव आटल्याने आता केवळ कंदलगावातल्या एकाच तलावात पाणी शिल्लक आहे. त्यामुळे ते पाणी सुद्धा रंगांमुळे खराब होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी हे पाऊल उचललंय.