कोल्हापूर : ज्योतिबाचा डोंगर फुलला, यात्रेचा आज मुख्य दिवस
Continues below advertisement
‘चांगभलं’चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण करत वाडी रत्नागिरीतील जोतिबाच्या चैत्र यात्रेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे... गुरुवारी पहाटेपासूनच हलगीच्या ठेक्यावर डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या. आजच्या मुख्य यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, सर्व यंत्रणा भाविकांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी सज्ज आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून भाविक सासनकाठ्यांसह दाखल झाल्याने डोंगर गुरुवारीच गजबजल्याचं चित्र होते.
Continues below advertisement