कोल्हापूर : दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज समारोप
Continues below advertisement
चांगभलंचा गजर, गुलाल खोबऱ्याची उधळण करत कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा समारोप झालाय. श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीमध्ये दख्खनचा राजा जोतिबाची ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडलीये. आज चैत्र्य यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पहाटेपासूनच पारंपरिक वाद्यांसह हलगीच्या ठेक्यावर डोंगरावर सासनकाठ्या दाखल झाल्या. आंध्र प्रदेशसह कर्नाटक, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक सासनकाठ्यांसह दाखल झाल्याने डोंगर अगती फुलून गेला होता. यावेळी देहभान विसरुन सासनकाठ्यांचा तोल सांभाळत भाविकांनी नृत्य केलं. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत मानाच्या सासनकाठ्यांचं पूजन करण्यात आलं.
Continues below advertisement