कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ

Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात गेले सहा दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळं शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापुरातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. यामुळं जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शंभरपेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळं पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांनाही यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान पंचगंगेच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे, पंचगंगा नदी दुथडी वाहू लागलीय.. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram