कोल्हापूर : अंबाबाईचं दर्शन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सरकारच्या विरोधातील पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात आज कोल्हापूरातून झाली. अंबाबाईच्या दर्शनाने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर हल्लाबोल आंदोलन पुकारलं होतं. विदर्भ आणि मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळतो., हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement