कोल्हापूर : काळभैरवाच्या यात्रेचा उत्साह, काळभैरी डोंगरावर भाविकांची गर्दी
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लजचं ग्रामदैवत असलेल्या काळभैऱवच्या यात्रेचा मुख्य दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेसाठी काळभैरी डोंगरावर लाखो भक्तांनी हजेरी लावली. या यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील भाविकही मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. दरम्यान काल काळभैरीच्या पालखीने नगरप्रदक्षिणा पार पडली. पालखीचं दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक गडहिंग्लजमध्ये दाखल झाले होते. गुलालाच्या उधळणीत आणि काळभैरीच्य़ा नावानं चांगभलंच्या गजरात गडहिंग्लज शहर दुमदुमून गेलं होतं.
Continues below advertisement