कोल्हापूर: महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड

Continues below advertisement
कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेस पक्षाच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांची निवड झाली आहे... तर भाजप-ताराराणीच्या प्रतिस्पर्धी रूपराणी निकम य़ांचा या निवडणुकीत पराभव झालाय... बोंद्रे यांना महापौरपदाच्या निवडणुकीत 44 मतं मिळाली तर निकम यांना 33 मतं मिळाली... तर, शिवसेनेच्या तटस्थ राहण्याच्या भूमिकेमुळे आणि सेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचा विजय सुकर झालाय... त्यामुळे शिवसेनेनं भाजपची चांगलीच गोची केल्य़ाचं बोललं जातंय... दरम्यान आजच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर महापालिकेसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात कऱण्यात आला....
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram