कोल्हापूर : दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का? : चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
‘दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?’ असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांना केला आहे. राजू शेट्टी यांनी 16 जुलैपासून मुंबईला होणारा दूधपुरवठा तोडण्याचा इशारा दिलाय. “घरातलं दूध आणि भाजीपाला रस्त्यावर कशाला ओतता?” असा सवाल करत दूध रोखणं ही शेतकरी आंदोलनाची पद्धत नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्य़ानुसार शासन होईल असंही चंद्रकांत पाटील सांगायला विसरले नाहीत.
Continues below advertisement