कोल्हापूर : अंबाबाईच्या मंदिरात प्लास्टिकच्या पिशवीवर बंदी
Continues below advertisement
कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरात प्लास्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आलीय. आजपासून प्रायोगिक तत्वावर कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरात अंमलबजावणी सुरु झालीय.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे साधारणपणे साडेतीन हजार मंदिरं आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या सर्व मंदिरांमध्ये प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे.
भाविक आणि परिसरातील दुकानदारांच्या समन्वयानं हा निर्णय़ घेण्यात आलाय. मंदिर परिसरातील दुकानदारांनी पुजेचं सामान देताना कागदी पिशव्यांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय. याला दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय. त्यामुळे कोल्हापुरकरांचा हा आदर्श राज्यातील इतर देवस्थानांनीही घ्यायला हरकत नाही.