कोल्हापूर : अश्विनी बिद्रे प्रकरणी सांगली जिल्ह्यातील कुपवाडमधून एक व्यापारी पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी वेगाने पावलं टाकली आहेत. याप्रकरणी अजून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजेश पाटील नावाच्या इसमाला कळंबोली पोलिसांनी जळगावातून अटक केली. या प्रकरणात अश्विनी यांचा प्रियकर पोलिस अधिकारी अभय कुरुंदकरला यापुर्वीच अटक केली आहे.अभय कुरुंदकर तीन वर्ष सांगली जिल्ह्यात कार्यरत असताना त्याचा संपर्क एका व्यापाऱ्य़ाशी वारंवार आला. बिद्रे गायब होण्याआधी कुरुंदकरने राजेश पाटील आणि त्या व्यापाऱ्याला वारंवार फोन केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे रविवारी रात्री कुपवाडमधून या व्यापाऱ्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. हा व्यापारी कुरुंदकरचे आर्थिक व्यवहार पाहत असल्याची चर्चा आहे.
Continues below advertisement