कोल्हापूर: खासगी ट्रॅव्हल्सला आग, दोन प्रवाशांचा मृत्यू
कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर आत्माराम ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून दोन प्रवाशांचा मृत्यू झालाय. तर 16 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास गगनबावड्याजवळील लोंघे गावात ही घटना घडली.
गाडीच्या एसी यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानं गाडीला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत होरपळून मृत्यू झालेले बंटी आणि विकी भट दोघेही पुण्याचे रहिवाशी आहेत.
मात्र चालत्या बसला आग लागण्याच्या घटनेनं खासगी प्रवास किती सुरक्षित आहे यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.