कोल्हापूर/नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात प्रत्येक आरोपीची भूमिका समोर
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. हत्या केल्यानंतर चार आरोपींनी कशाप्रकारे पुरावे नष्ट केले, हे समोर आलं आहे. अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन त्यांचे धड आणि हात, पाय, मुंडके वेगळे करण्यात आले. अभय कुरुंदकर याने तुकडे केलेल्या हात, पाय आणि डोके यांची विल्हेवाट लावली. मात्र धड टाकण्यासाठी त्याने चौथा आरोपी महेश पळणीकर याची मदत घेतली.