कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात सर्व जातींचे पुजारी नेमणार
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार आहेत. देवस्थान समितीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारीपदासाठी 113 अर्ज आले आहेत. त्यापैकी सहा अर्ज हे महिला पुजाऱ्यांचे असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. मंदिरात कामकाजासाठी 55 पुजाऱ्यांची गरज आहे.