कोल्हापूर : अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी अभय कुरुंदकर ताब्यात
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना अटक करण्यात आली आहे. एबीपी माझाने 16 नोव्हेंबर रोजी बेपत्ता अश्विनी बिद्रे यांच्या बातमीला वाचा फोडली होती. त्या बातमीनंतर नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मूळच्या कोल्हापूरमधल्या हातकणंगलेच्या असलेल्या अश्विनी बिद्रे कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये रुजू होण्यासाठी दीड वर्षांपूर्वी रवाना झाल्या. पण तिथे पोहोचल्याच नाहीत. तेव्हापासून अश्विनी बिद्रे या बेपत्ता आहेत.
दरम्यान अश्विनी यांना कुरुंदकर यांनीच बेपत्ता केल्याची तक्रार अश्विनी यांच्या कुटुंबियांनी दाखल केली. पण दीड वर्षांनंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पण एबीपी माझाने बातमी दाखवताच तातडीने चक्रं फिरली. आणि कुरुंदकर यांना अटक करण्यात आली.