Kyaar Cyclone Effect | कोकण किनारपट्टीला क्यार वादळाचा धोका | ABP Majha
Continues below advertisement
क्यार वादळाचा कोकण किनारपट्टीला फटका बसलाय. कारण दर्याला उधाण आलंय. त्यामुळे किनारपट्टीवरील घरात पाणी शिरलंय.किनारपट्टी लगतच्या घरामध्ये पाणी शिरलंय.
समुद्राच्या उधाणाचा फटका पिरावाडी, जामडूल बेटाला बसला. यात खाडीचे पाणी जामडूल,पिरावाडी येथील खाडी किनारपट्टी लगतच्या घरामध्ये गेल्याने घरातील अन्न धान्यासहीत इलेक्ट्रॉनिक वस्तू भिजून गेल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल झालेत. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतही पाणी शिरल्याने पिण्याचे पाणी ही दुषित झाले.काही मच्छिमारांच्या जाळीचे ही नुकसान झाले. पुढील दोन दिवस उधाणाचा धोका कायम असल्याने जामडूल बेटावरील ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत.