Kisan Long March : मुंबई : शेतकऱ्यांच्या मागण्या 6 महिन्यात पूर्ण करु : गिरीश महाजन
Continues below advertisement
तब्बल 200 किलोमीटरची पायपीट करुन नाशिकवरुन मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येताना दिसत आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत, शेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
मागण्या मान्य करण्याचं केवळ आश्वासन नको, तर लेखी हवं, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. लेखी मागणं योग्य नाही, मात्र यापूर्वीचे दोन अनुभव चांगले नाहीत म्हणून लेखी आश्वासनाचा आग्रह आहे, असं आमदार जेपी गावित म्हणाले.
दरम्यान, लेखी आश्वासन देऊन उद्या सभागृहात निवेदन केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.