खेळ माझा : विदर्भाचा पुन्हा डंका, अंडर 19 कूच बिहार करंडकावर नाव
नागपूर : रणजी करंडकाच्या विजेतेपदानंतर अंडर 19 कूच बिहार स्पर्धेतही विदर्भानं पहिल्यांदाच विजेतेपदाचा मान मिळवला. अंतिम सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीवर विदर्भानं मध्य प्रदेशचा पराभव केला. हा सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात विदर्भानं मध्य प्रदेशचा पहिला डाव 289 धावांत गुंडाळला.