खेळ माझा : टीम इंडियानं माती का खाल्ली?
Continues below advertisement
विराट कोहलीच्या टीम इंडियाला केपटाऊन कसोटीपाठोपाठ सेन्च्युरियन कसोटीतही लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा १३५ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं भारतीय संघाला विजयासाठी २८७ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियानं आदल्या दिवशीच्या तीन बाद ३५ धावांवरून, अवघ्या १५१ धावांत लोटांगण घातलं. टीम इंडियाला लागोपाठ दोन कसोटी सामन्यांमध्ये स्वीकाराव्या लागलेल्या लाजिरवाण्या पराभवावर कर्णधार विराट कोहलीच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Continues below advertisement