खेळ माझा : बॉल टॅम्परिंग प्रकरणी स्टीव्ह स्मिथचा माफीनामा, पत्रकार परिषदेत स्मिथला अश्रू अनावर
Continues below advertisement
केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाची सारी जबाबदारी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथनं स्वीकारली. जोहान्सबर्गहून ऑस्ट्रेलियात दाखल झालेला स्मिथ सिडनीत पत्रकार परिषदेला सामोरा गेला. जेमतेम पाच मिनिटांच्या या पत्रकार परिषदेत स्मिथला वाक्यावाक्याला हुंदका अनावर झाला होता. त्याला अधूनमधून रडूही कोसळलं. तरीही धीर करून तो बोलत राहिला. या पत्रकार परिषदेत स्मिथनं साऱ्या देशाची माफी मागितली. तो म्हणाला की, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार या नात्यानं बॉल टॅम्परिंगची सारी जबाबदारी मी स्वीकारतो. माझ्याकडून मोठी चूक झाली आणि त्या चुकीचे परिणामही भोगतो आहे. ती चूक सुधारण्यासाठी आणि त्यातून झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी मी शक्य ते सारे प्रयत्न करेन.
Continues below advertisement