खेळ माझा : नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पथकाला गृहमंत्रांकडून शुभेच्छा
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला रवाना होत असलेल्या भारतीय पथकातल्या खेळाडूंना मोठ्या थाटात निरोप दिला. ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्टमध्ये ४ ते १५ एप्रिल या कालावधीत एकविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी भारतीय खेळाडूंना उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.