खेळ माझा | हरभजनची बीसीसीआयच्या निवड समितीवर टीका

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत भारतीय संघाची कोणत्या निकषांवर करते, हे समजणं आपल्यासाठीही कठीण असल्याची टीका भारताचा ऑफ स्पिनर हरभजनसिंगनं केली आहे. अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्धच्या सलग सहा कसोटी सामन्यांमध्ये करुण नायर हा राखीव खेळाडूंत होता. मग वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याला वगळण्यात कसं काय येऊ शकतं, असा सवाल हरभजननं केला आहे. करुण नायरला का वगळलं हे कोडं आपल्याला न सुटणारं आहे, असंही तो म्हणाला. सलग सहा कसोटी सामन्यांमध्ये खेळवण्यातही न आलेला फलंदाज, त्या संघात स्थान न मिळण्याइतका अचानक वाईट कसा होऊ शकतो, असा प्रश्नही हरभजननं केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola