
खेळ माझा: इंग्लंड फुटबॉल संघाचा कबड्डी खेळून वॉर्मअप
Continues below advertisement
रशियातल्या फिफा विश्वचषकाला अवघ्या दहाबारा दिवसांवर आलेला असताना इंग्लंडचे फुटबॉलवीर वॉर्मअप आणि संघातलं वातावरण हलकंफुलकं ठेवण्यासाठी चक्क कबड्डीचा सराव करत असल्याची चित्रफित समोर आली. टीम इंडियासह क्रिकेटच्या दुनियेतले बहुतेक संघ वॉर्मअपसाठी फुटबॉल खेळतानाची दृश्यं आपण पाहिली आहेत. पण कबड्डीसारख्या एका अस्सल भारतीय खेळानं इंग्लंडच्या फुटबॉल संघाचं लक्ष वेधून घेतल्याचं वास्तव भारतीय कबड्डीरसिकांसाठी सुखद धक्का ठरला आहे. इंग्लंडच्या संघातील जेमी वार्डी, जेस लिन्गार्ड आणि फिल जोन्स हे तीन फुटबॉलवीर आपल्याला चढाईपटूच्या भूमिकेत दिसतात. तसंच रहिम स्टर्लिंग, डॅनी रोस आणि अॅशली यंग यांच्यासह इतरांनी बचावपटूंच्या भूमिकेत कव्हर लावल्याचं दिसून येत आहे.
Continues below advertisement