खेळ माझा : मेहेरझाद इराणीची दादर-विरार सायकल शर्यतीत बाजी
Continues below advertisement
राईप मँगो स्पोर्ट्स आयोजित दादर विरार सायकल शर्यतीत मुंबईच्या मेहेरझाद इराणीनं बाजी मारली. या शर्यतीत मेहेरझादने तब्बल तीन मिनिटांचे अंतर राखत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. सुमारे 82 किलोमीटर अंतराची ही शर्यत मेहेरझादने 1 तास 27 मिनिटे 44 सेकंदात पूर्ण केली. विजेत्या मेहेरजाद इराणीला रोख 21 हजार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेत प्रकाश आळेकर आणि सूर्या ठाठू अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. यंदाच्या दादर विरार शर्यतीत मुंबईतील शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
Continues below advertisement