VIDEO | रंगपंचमीनिमित्त खासदार सुप्रिया सुळेंकडून रंगांची उधळण | दौंड, पुणे | एबीपी माझा
सध्या दौंड तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा सुरु आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे रंगपंचमीनिमित्त यात्रा भरली आहे. या यात्रेत सहभाग घेत खासदार सुळे यानी रंगाची उधळण केली. आपल्या सहकाऱ्यांबरोबर रंग खेळत या यात्रेतील लेझीम व टाळाच्या तालावर ठेका धरत रंगपंचमी साजरी केली.