पुणे: पुण्यात अलिशान गाड्या कोण पेटवतंय?
Continues below advertisement
सांस्कृतीक पुण्याची ओळख आता गाड्या पेटवण्याचं शहर अशी बनत चालली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.... कारण गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गाड्या पेटवण्याच्या घटनांमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. खडकीतील सोने-चांदीचे व्यापारी महिपाल पारेख यांच्या बंगल्यासमोर उभ्या असलेल्या दोन गाड्यांना अज्ञातांनी आग लावली. या आगीत सव्वा कोटीची महागडी पोर्शे कार आणि एक अल्टो अशा दोन गाड्या जळून खाक झाल्यात. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. यात तिघे जण आग लावताना स्पष्ट दिसत आहे.
Continues below advertisement