नासाला गवसली नवी सूर्यमाला, केप्लर टेलिस्कोपच्या आधारे शोध
Continues below advertisement
नासाला पृथ्वीसारख्या सूर्यमालेप्रमाणेच आणखी एक नवी सूर्यमाला सापडली आहे. नासानं केप्लर स्पेस टेलिस्कोप आणि कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे हा शोध लावला. नासानं शोध लावलेल्या या ग्रहमालिकेत थोडेथोडके नसून आठ ग्रह आहेत, अशी माहिती नासाने दिली आहे. पृथ्वीसारख्या आपल्या ज्ञात ग्रहमालिकेनंतर सापडलेली ही सर्वात मोठी ग्रहमालिका आहे असं मानलं जातं. सध्या तरी त्यापैकी कुठलाही ग्रह जीवसृष्टीसाठी पोषक नसल्याचं भाकीत शास्त्रज्ञ करत आहेत.
Continues below advertisement