औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाला शांतता राखण्याचं पोलिसांचं आवाहन

Continues below advertisement
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज काहीसा आक्रमक झाल्य़ाचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या कायगाव इथं आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
संतप्त जमावानं अग्निशामन दलाच्या गाडीची तोडफोड करत ती जाळण्याच प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालीय. त्यामुळे इथं काहीकाळ तणावाचं वातावरण होतं. आता या परिसरात शांतता आहे.
काल औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणानं गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र केलं आहे. तर उद्या सकाळपर्यंत औरंगाबादेत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram