औरंगाबाद : कायगावात काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मोर्चेकऱ्यांची चंद्रकांत खैरेंना धक्काबुक्की
Continues below advertisement
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार झाले. लहान भाऊ अविनाश शिंदेने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे अंत्यसंस्कारासाठी आले होते. मात्र त्यांना प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. मराठा मोर्चेकऱ्यांना खासदार चंद्रकांत खैरे यांना अक्षरश: हाकलून लावलं. अनेक जण त्यांच्यावर धावून गेले.
Continues below advertisement