
Kyaar Strom | क्यार वादळाचा फटका, कोकणात किनारपट्टीवरील घरांमध्ये समुद्राच्या खाडीचं पाणी | ABP Majha
Continues below advertisement
‘क्यार’ वादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. किनारपट्टी भागात दर्याला उधाण आलं आहे. त्यामुळे किनारपट्टी लगतच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे. तळकोकणात दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तळकोकणात मुसळधार पाऊस पडतं आहे. कमी दाबाच्या पट्यामुळे पुढील 24 तास असाच पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठं नुकसान झालं आहे. तर किनारपट्टी भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी लगतच्या वस्तीत गेल्याने त्याठिकाणच्या ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.
Continues below advertisement