श्रीनगर : अनंतनाग आणि शोपियामध्ये 12 दहशतवाद्यांना कंठस्नान, चकमकीत 3 जवानही शहीद
Continues below advertisement
जम्मू काश्मिरमध्ये अनंतनाग आणि शोपियानमध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 12 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलंय. तसंच अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यातही लष्कराला यश आलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय लष्कराला मिळालेल्या सर्वात मोठ्या यशांपैकी ही एक घटना असल्याचं बोललं जातंय...
दरम्यान या धडाकेबाज कारवाईमध्ये सैन्याचे 3 जवान मात्र शहीद झाले आहेत, तर 4 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये कॅप्टन उमर फैय्याज यांची हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा समावेश आहे.