कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगलु वाजलं, काँग्रेस-भाजपमध्ये लढत
Continues below advertisement
काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यानुसार येत्या 12 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. संपूर्ण निवडणूक एकाच टप्प्यात पार पडेल. त्यानंतर 15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. नवी दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी ही घोषणा केली. या निवडणुकीत 4 कोटी 96 लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत ईव्हीएम मशिन्ससोबतच व्हीव्हीपॅट मशिन्सचाही वापर होणार आहे. कर्नाटक हे काँग्रेसची सत्ता असलेल्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे इथं सत्ता टिकविण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर असेल. तर भाजपनंही बीएस येडियुरप्पांच्या नेतृत्वात कंबर कसली आहे.
Continues below advertisement